पत्रकारांनी पत्रकारितेतील बदल अंगीकारणे गरजेचे : डाॅ. अतुल भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | समाजामध्ये डॉक्टर आणि पत्रकारांना चूक करायला फार कमी जागा आहे. डॉक्टरांकडून चूक झाल्यास ती केवळ एखाद्या व्यक्ती पुरती मर्यादित राहते. परंतु, पत्रकारांकडून एखादा शब्द चुकीचा गेल्यास दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते, याचीही जाणीव पत्रकारांनी ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे पत्रकारितेत नेहमीच स्वतः हा शब्द न ठेवता समाजाला सामोरे ठेवून पत्रकारांनी कार्य करावे. पत्रकारितेत येणाऱ्या पुढील काळात अनेक बदल होत आहेत, तेव्हा ते बदल पत्रकारांनी अंगी बाळगणे गरजेचे असल्याचे मत कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केले.

कराड येथील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात गुरुवारी 6 रोजी पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश घाडगे होते. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रमोद सुकरे, शशिकांत पाटील, गोरख तावरे,  सतीश मोरे, सचिन शिंदे, हेमंत पवार, देवदास मुळे, दिपक पवार, संभाजी थोरात, दिनकर थोरात, हैबत अडके, सचिन देशमुख,  माणिक डोंगरे, नितिन ढापरे, राजेंद्र पाटील, अस्लम मुल्ला, संदिप चेणगे, खंडू इंगळे, सुशील लाड, बीजेसीच्या प्राध्यापिका स्नेहलता शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. लोहार मॅडम यांनी केले. तर आभार प्रा. जीवन अंबुडारे यांनी मानले. यावेळी

कराडला स्कूल ऑफ जर्नालिझमची गरज : डाॅ. अतुल भोसले

कराडमध्ये स्कूल ऑफ जर्नालिझम सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी पत्रकारांचीच एक कमिटी तयार करून एखादी एनजीओ स्थापन करावी. यामाध्यमातून जर्नालिझम सुरू करून त्यामध्ये पत्रकारांव्यतिरिक्त कोणाचाही हस्तक्षेप राहणार, नाही याची दक्षता घ्यावी. या एनजीओला अनेक सामाजिक संस्था हातभार लावतील. परंतु, स्कुल ऑफ जर्नालिझम उभे करण्यासाठी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश घाडगे यांनीही आपले योगदान द्यावे, अशी अपेक्षा कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केली.

 

Leave a Comment