नरेंद्र मोदींनी पाच वर्षात एकही सुट्टी घेतली नाही – जुही चावला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर अनेक कलाकार व्यक्त होत आहेत. काही कलाकार मोदी सरकारच्या विरोधात मत मांडत आहेत तर काही कलाकार मोदी सरकारच्या समर्थनार्थ मत मांडत आहे. अभिनेत्री जुही चावलाने मोदी सरकारच्या समर्थनार्थ मत मांडले आहे. ती भाजपने आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी झाली होती. या वेळेस बोलताना तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तोंडभरून कौतुक केले.

पंतप्रधान मोदी नेहमी देशाच्या विकासाबद्दल बोलत असतात

तिने म्हंटले की, “येथे असे किती जण उपस्थित आहेत ज्यांनी पाच वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. फक्त एकच अशी व्यक्ती आहे ज्याने पाच वर्षात एकही सुट्टी घेतली नाही ते म्हणजे आपले पंतप्रधान. मी कोणत्याही पक्ष किंवा राजकारणाबद्दल बोलत नसून एका सामान्य व्यक्तीबद्दल बोलत आहे जे आपले पंतप्रधान आहेत. ते नेहमी आपल्या देशाच्या विकासाबद्दल बोलत असतात. देशासाठी काय केलं जाऊ शकतं याचाच विचार ते नेहमी करत असतात”.

मुंबई येथे जेएनयू येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात फ्री काश्मीर असे पोस्टर वापरले होते. त्याच्या निषेधार्थ भाजपने मुंबईतील सावरकर स्मारकात आंदोलन आयोजित केले होते.