नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) गेले काही काळ देशात 5G नेटवर्कच्या (5G Network) अंमलबजावणीविरोधात बोलत होती. याच अनुषंगाने या अभिनेत्रीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यासंदर्भात मे महिन्यात संबंधित आदेशात सुधारणा करण्याची मागणी केली गेली होती. समोर आलेल्या माहितीनुसार आता अभिनेत्रीने आपली याचिका मागे घेतली आहे. जूही चावलाने 31 मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि लोकं, प्राणी आणि वनस्पती यांच्यावरील रेडिएशनच्या परिणामांशी संबंधित मुद्दे उपस्थित केले होते. कोर्टाने गेल्या महिन्यात त्यांची याचिका फेटाळून लावत 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.
जूही चावलाचे वकील दीपक खोसला यांनी दिलेल्या निवेदनानंतर न्यायमूर्ती जयंत नाथ यांनी याचिका मागे घेण्यास परवानगी दिली आहे. जुहीच्या विकीलाने तर्क केला कि जुही ‘कधी खटल्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचली नाही’, फक्त सिव्हिल प्रक्रियेच्या संहितेच्या अनुषंगाने ते डिसमिस किंवा परत केले जाऊ शकते.
या याचिकेमध्ये अभिनेत्रीने पर्यावरणाबद्दल चिंता व्यक्त केली
प्राण्यांवर आणि मुलांवर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त करत, जुही चावलाने उच्च न्यायालयात 31 मे रोजी एक याचिका दाखल करून देशात 5G नेटवर्कच्या स्थापनेला आव्हान दिले होते. जुही चावलाने आपल्या याचिकेत दावा केला आहे की” एकदा 5G लागू झाल्यावर कोणालाही याच्या एक्सपोजर मधून सुटता येणार नाही.”
दिल्ली उच्च न्यायालयाने 4 जून वायरलेस नेटवर्क तंत्रज्ञानाला आव्हान देणारी अभिनेत्री जूही चावलाची याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्यांना 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. “सदोष”, “कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर” आणि “प्रसिद्धी मिळवण्यासाठी” याचिका दाखल करण्यात आली असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.