हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकीकडे देश इतका प्रगत होत चालला आहे कि त्याला थांबविणे कुणाच्याही हातात नाही. या उलट देशाच्या प्रगतीवर जो तो आनंदी आहे. मात्र 5G काय खरच जरुरी आहे..? बरं मान्य आहे तर का? आणि हे कितपत सुरक्षित आहे याबाबत विचारणा करीत या तंत्रज्ञानाला विरोध करणारी अभिनेत्री जुही चावला हिने केलेली दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिची याचिका फेटाळून न्यायालयाने तिला चक्क २० लाखाचा दंड सुनावला. यानंतर जुहीने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तिने आपली बाजू मांडत 5G तंत्रज्ञान जरूर आणा असे म्हटले आहे. आपली भूमिका मांडताना जुहीने सांगितले कि, आम्ही 5Gच्या विरोधात नाही, फक्त तुम्ही ते सुरक्षित आहे याची हमी द्या.
https://www.instagram.com/tv/CP4-T4npL9s/?utm_source=ig_web_copy_link
सोशल मीडिया इंस्टाग्रामवर अभिनेत्री जुही चावल्याने आपली भूमिका स्पष्ट करणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने म्हटले आहे कि, ‘नमस्ते, गेल्या काही दिवसांत इतका गोंधळ, गदारोळ झाला की, मी स्वत:लाही ऐकू शकली नाही. या गोंधळात एक अतिशय महत्त्वपूर्ण संदेश विरला. तो म्हणजे, आम्ही 5G विरोधात नाही. उलट आम्ही तर याचे स्वागत करतो. कृपा करून 5G आणा. जरूर आणा.
https://www.instagram.com/tv/CPlr3mbJ_oh/?utm_source=ig_web_copy_link
फक्त आमची मागणी एवढीच आहे की, 5G सुरक्षित आहे, हे अधिका-यांनी स्पष्ट करावे. कृपा करून तुम्ही सर्टिफाइड करा, यावरचे संशोधन, अभ्यास सगळे काही सार्वजनिक करा, जेणेकरून या तंत्रज्ञानाबद्दलची आमच्या मनातील भीती दूर पळून जाईल आणि आम्ही आरामात झोपू शकू. हे तंत्रज्ञान गर्भवती महिला आणि त्यांच्या गर्भात वाढणाऱ्या बाळांसाठी सुरक्षित असावे, इतकेच आमचे म्हणणे आहे आणि आम्हाला हेच जाणून घ्यायचे आहे.’
https://www.instagram.com/p/CPdYSYmplLI/?utm_source=ig_web_copy_link
याआधी जुही गेल्या कित्येक वर्षांपासून मोबाइल टॉवरच्या विकिरणांमुळे पर्यावरण तसेच मानवी आरोग्याला धोका आहे असा दावा केला आहे. तसेच या तंत्रज्ञाना विरोधातही तिची अधिक काहीशी बाजू होती. या पार्श्वभूमीवर तिने 5G तंत्रज्ञानाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयाकडे दाद मागितली. मात्र न्यायालयाने तिची ही याचिका केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हणत फेटाळून लावली. इतकेच नव्हे तर, याचिका करण्याआधी जुही चावलाने सरकारकडे हा प्रश्न का मांडला नाही? 5G तंत्रज्ञानाविरोधात जुही हिचे म्हणणे सरकारने ऐकले नाही? असे घडले आहे का? सरकारने तुमच्या हक्कावर गदा आणल्याचा प्रकार घडला आहे का? अशा प्रश्नांची मालिका तयार करीत न्यायालयाने तिची याचिका फेटाळून २० लाखांचा दंड सुनावला होता.