हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी महाराष्ट्रातील कोरोना संकटात विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळावरुन, देवेंद्र फडणवीस यांची कानउघडणी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री होते. मात्र सध्या मुख्यमंत्रिपदासाठी ते उतावीळ झाले असून, त्यांच्याकडून चुकीची पावलं टाकली जात आहेत. अस ज्युलिओ रिबेरो यांनी म्हंटल.
देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री होते. माजी मुख्यमंत्री, आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कार्यकाळात गृहमंत्री म्हणून लागू केलेल्या कायद्याचा भंग करू नये, अशा शब्दांत माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेलो यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. एका वृत्तपत्रात रिबेलो यांनी यासंदर्भात लेख लिहिला आहे.
ब्रूक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ते गृहमंत्री असताना केलेला नियमच मोडीत काढला. राज्याच्या सुव्यवस्थेचे आणि कायद्याचे प्रतिक असलेल्या पोलीस ठाण्यात जाणे, त्याठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घालणे, अधिकाऱ्यांची चढ्या आवाजात बोलणे या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या पदाला साजेशा नव्हत्या. फडणवीस यांनी त्यांचा संयम गमावला, असे रिबेरो यांनी म्हटले आहे.
ब्रूक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ते गृहमंत्री असताना केलेला नियमच मोडीत काढला. खरंतर रेमडेसिवीर इंजेक्शन कोणाला वैयक्तिक किंवा संघटनांना मिळत नाही. कोरोना संकटात केवळ राज्य सरकारलाच फॅक्टरीतून इंजेक्शन वितरकांपर्यंत पोहोचवण्याचा अधिकार आहे. मात्र, तरीही ब्रूक फार्माच्या पाच वेगवेगळ्या गोदामांमध्ये इंजेक्शन्सचा साठा कसा आढळून आला, हा स्वतंत्र चौकशीचा विषय आहे, असा संशय रिबेलो यांनी व्यक्त केला आहे.