धक्कादायक ! धारावीत कबड्डीपटूची डोक्यात स्टंप घालून हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – धारावीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कामराज नगर येथील 26 वर्षीय कबड्डीपटूची शुक्रवारी सायंकाळी पूर्व वैमनस्यातून हत्या (Murder) करण्यात आली. मृत विमलराज नाडर याच्या पश्चात आई-वडील व भावंडे असा परिवार आहे. या हत्येप्रकरणी (Murder) पोलिसांनी आरोपी मल्लेश चितकंडी याला अटक केली आहे. यावेळी धारावी पोलीस ठाण्याबाहेर शेकडो लोकांनी येऊन निदर्शने केली. त्यांनी या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्याची मागणी केली आहे. धारावी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, मृत विमलराज नाडर याला मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास त्याच्या परिसरात राहणाऱ्या मल्लेश चितकंडी याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून लाकडी स्टंपने डोक्यावर मारहाण (Murder) केली. त्यानंतर जखमी विमलराजला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणी पोलिसांनी धारावी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302, 323, 504 अन्वये हत्येचा (Murder) गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी मल्लेश चितकंडी याला त्याच्या राहत्या घरातून उचलले. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्ह्यात सहभाग असल्याचे कबूल केले. यानंतर धारावी पोलिसांनी त्याला अटक केली.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार