काबुल: तालिबानने पंजशीरचा ताबा मिळाल्याचा आनंद साजरा करत असताना केलेल्या हवाई गोळीबारात झाला अनेकांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काबूल । तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती आता बिकट झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या मृत्यूची भीती वाटते आहे. दरम्यान, तालिबानी लढाऊंनी पंजशीरवरही कब्जा केल्याची बातमी आता आली आहे. तालिबानने पंजशीरवर कब्जा केल्याची बातमी ऐकून आनंद साजरा करत असताना केलेल्या हवाई फायरिंगमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

अस्वाका न्यूज एजन्सीच्या म्हणण्यानुसार, तालिबानी लढाऊंना पंजशीर मिळाल्याची बातमी कळताच त्यांनी आनंदात हवेत गोळीबार सुरू केला. या दरम्यान, मुलांसह अनेक लोकांचा मृत्यू झाला. या गोळीबारात अनेक लोकं जखमी झाल्याचेही वृत्त आहे. तालिबान पंजशीरवर कब्जा केल्याचा दावा करत असेल, परंतु नॉदर्न अलायन्सने हा दावा जोरदारपणे नाकारला आहे. यासह, नॉदर्न अलायन्सने दावा केला आहे की,” त्यांनी तालिबानचे मोठे नुकसान केले आहे.”

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तालिबान लढाऊंच्या गोळीबारात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात इतकी गर्दी झाली होती की, ऑपरेशन रूममधील जागाच संपली होती अशी नोंद आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली की, आपत्कालीन कक्षातच ऑपरेशन करावे लागले.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या रिपोर्ट नुसार तालिबान्यांनी पंजशीरलाही ताब्यात घेतले आहे. तालिबानच्या तीन सूत्रांच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. तालिबानी कमांडर म्हणाला, ‘अल्लाहच्या कृपेने आम्ही संपूर्ण अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. त्रास देणाऱ्यांचा पराभव झाला आहे आणि पंजशीर आमच्या आदेशाखाली आहे. या दरम्यान माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेहने अफगाणिस्तान सोडल्याच्या बातम्याही आल्या होत्या. रिपोर्ट नुसार, सालेहने याचा इन्कार केला आहे. त्यांनी टोलो न्यूजला सांगितले की,”त्यांनी देश सोडल्याच्या बातम्या खोट्या आहेत.”