कडकनाथ घोटाळा प्रकरण; रॅली धडकणार मंत्रालयावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी। कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायातील घोटाळ्याप्रकरणी गुंतवणूकदारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी बेळगाव येथून मोटारसायकल रॅली मोर्चा काढण्यात आला आहे. कोल्हापूर-सातारा-पुणे मार्गे हा मोर्चा शुक्रवार, दि. 13 रोजी मंत्रालयावर धडकणार आहे.

कडकनाथ घोटाळाप्रकारणी न्याय मिळावा अशी मागणी घेऊन गुंतवणूकदारांनी बेळगाव ते मुंबई रॅली काढली आहे. बेळगाव मधून निघालेली ही रॅली मंगळवारी कोल्हापुरात पोहचली होती. यावेळी ऐतिहासिक बिंदू चौकात या रॅलीच्या वतीने विविध  निदर्शने करण्यात आले. कॉ. दिग्विजय पाटील, कॉ. धनाजी गुरव, भाई सुभाष पाटील, प्रा. वासुदेव गुरव, स्वाभिमानीचे महेश खराडे, भागवत जाधव आदी या रॅलीत सहभागी झाले आहेत.

एमपीआयडी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सक्षम पोलिस अधिकार्‍याची नेमणूक करावी, शेतकरी राहत असलेल्या जवळच्या पोलिस ठाण्यात त्यांचे जबाब व्हावेत, या प्रकरणातील मास्टर माईंड असणार्‍यांवर कारवाई व्हावी, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाला असल्याने त्याची सखोल चौकशी व्हावी, संबंधित आरोपींची नार्कोे टेस्ट करण्यात यावी, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, अशा मागण्या या रॅलीत सहभागी झालेल्या गुंतवणूक दारांकडून करण्यात येत आहेत.

Leave a Comment