कराड | पुण्यात शिव छत्रपती स्टेडियम बालेवाडी येथे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रिडा स्पर्धेत काले गावच्या 34 वर्षीय सूनबाईने चक्क गोल्ड मेडलसह 2 सिल्वर मेडल जिंकले आहे. शूटींग क्रिडा प्रकारात काले येथील शीतल प्रीतम देसाई यांनी तीन पदके जिंकली आहेत. आता त्याचे लक्ष्य हे जागतिक ऑलिम्पिक स्पर्धा असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातून जवळपास 10 हजार 456 खेळाडूंनी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बहुउद्देशीय महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रिडा स्पर्धेत 39 क्रिडा प्रकार होते. या स्पर्धेत शीतल देसाई यांनी मिळवलेले यश सातारा जिल्ह्यासह काले गावासाठी अभिमानास्पद आहे. शीतल यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये नॅशनलाही 50 मीटर शूटींग स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले आहे.
शीतल देसाई या कृष्णा साखर कारखान्याचे माजी संचालक डाॅ. अजित देसाई यांच्या सूनबाई आहेत. त्याचे संपूर्ण प्रशिक्षण कराडमध्येच कोच सारंग थोरात यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. गेल्या 10 वर्षापासून त्या शूटींगचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना एक तीन वर्षाचा मुलगाही आहे.
शीतल देसाईंना तीन पदके
शीतल प्रीतम देसाई यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेत शूटिंगमध्ये 50 मीटर पिस्टल प्रकारात 1 गोल्ड आणि 10 मीटर एअर पिस्टल व 25 मीटर .22 मध्ये सिल्वर पदक पटकवले. आता 11 जानेवारी रोजी दिल्ली येथे इंटरनॅशल ट्रायल सिलेक्शनसाठी जाणार आहेत. आपले ध्येय जागतिक ऑलिम्पिक स्पर्धा असल्याचे शीतल देसाई यांनी सांगितले.