Kalmandavi Waterfall : मुंबईपासून अगदी जवळच आहे काळमांडवी धबधबा; पर्यटकांसाठी अगदी बेस्ट ठिकाण

Kalmandavi Waterfall
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Kalmandavi Waterfall । पावसाळा म्हंटल कि, हौशी पर्यटकांना फिरण्याची चाहूल लागते..पावसाळा सुरु झाला कि पर्यटक सर्वाधिक फिरण्यासाठी गडकिल्ले, धबधबा, धरण यांना पसंती देत असतात. तुम्हाला महाराष्ट्रातील मोठमोठ्या आणि प्रसिद्ध धबधब्यांची माहिती असेलच.. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका धबधब्या बद्दल सांगणार आहोत जो जास्त कोणाच्या परिचित नसतो… काळमांडवी धबधबा अस या धबधब्याचे नाव… महत्वाची बाब म्हणजे हा धबधबा मुंबईपासून अगदी तासाभराच्या अंतरावर आहे. आज आपण या धबधब्या बद्दल काही रंजक आणि खास गोष्टी जाणून घेऊयात…

मुंबईपासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर असलेला काळमांडवी धबधबा (Kalmandavi Waterfall) हा पर्यटकांसाठी आतिशय चांगला आणि प्रवासासाठी सोपा असणारा आहे, मुंबई, ठाणे आणि नाशिक या शहरापासून अगदी कमी वेळेत या धबधबापर्यंत पोहचता येते. त्यामुळे वनडे रिटर्न ट्रिप साठी काळमांडवी धबधबा बेस्ट पर्याय ठरू शकतो. पावसाळ्यात हा धबधबा पूर्णपणे प्रवाहित असतो, त्यामुळे स्थानिक ट्रेकर्ससाठी खूपच आकर्षक ठिकाण मानलं जातं. याठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रेकिंगसाठी पर्यटक येतात्त. महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यात हा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात तसेच देशभरातून अनेक ठिकाणचे पर्यटक येतात .या धबधबाचे आणखी एक वैशिठ्ये हा धबधबा उन्हाळी धबधबा म्हणून देखील ओळखला जातो..तसेच एका डोहात हा धबधबा कोसळत असतो आणि या डोहात सूर मारण्याच्या थरार अनुभवण्यासाठी ट्रेकर्स मंडळी धबधब्याला आवर्जून भेट देत असतात.

काळमांडवी धबधब्याला कसे जाल? Kalmandavi Waterfall

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात काळमांडवी हा धबधबा येतो, जव्हार शहरापासून अवघ्या 8 किमी अंतरावर हा धबधबा आहे. केळीचा पाडा या गावातून धबधब्याजवळ जाता येते. जर तुम्ही मुंबईहून येत असाल तर तुम्ही थेट दादर ते पालघर असे लोकल रेल्वेने पालघरला यावे लागेल, आणि पालघरहून बसने जव्हारला जावे लागेल. जव्हार शहराच्या दक्षिणेस 8 किमी अंतरावर, काळमांडवी धबधबा आहे. जर विमानाने यायचे असेल तर नाशिक विमानतळ 80 किलोमीटर वरती आहे तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 100 किलोमीटरवर आहे. एस टी. महामंडळाचा पर्याय देखील उपलब्ध आहे. जव्हार आणि पालघर या शहरातून बसने धबधबाकडे जाण्यास आहेत.

काळमांडवी धबधब्याची वैशिष्ठ्ये

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबई,पालघर असा मोठ्या शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असूनही हा धबधबा (Kalmandavi Waterfall) अज्ञात धबधबा म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच येथे स्वच्छता मोठ्या प्रमाणात दिसते. पावसाळ्यात हा धबधबा मोठ्या प्रमाणात प्रवाहित असतो, त्यामुळे स्थानिक ट्रेकर्ससाठी खूपच आकर्षक ठिकाण मानलं जातं. जुलै ते सप्टेंबर हा काळ काळमांडवी धबधबा पाहण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. याठिकाणी तुम्ही छान भिजू शकता, त्यामुळेच तरुणांची गर्दी फार असते. काळमांडवी धबधबा हा 100 मीटर उंच असून तो वर्षभर वाहतो.या भागातील इतर जवळपास सर्व धबधबे पावसाळा असेपर्यंतच प्रवाहित असतात, मात्र, हा धबधबा पावसाळा जाऊन हिवाळा संपून वसंत ऋतुची चाहुल लागली तरी हा वाहत असतो. मुंबई शहरापासून जवळ असलेला हा हिडन वॉटरफॉल अर्थात डोंगरकपारीत लपलेला धबधबा हा पर्यटक आणि ट्रेकर्स यांना आकर्षित करतो