हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kalonji Seeds Benefits) आपल्या दैनंदिन जीवनात आपण बरेच पदार्थ खात असतो. पण ते सगळेच आरोग्यदायी असतील असे काही सांगता येत नाही. एखाद्या पदार्थाची चव, रंग, रूप तो आरोग्यासाठी चांगला की वाईट हे ठरवू शकत नाही. तर त्या पदार्थात असणारे गुणधर्म हे आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाचे आहेत हे त्या पदार्थाला आरोग्यदायी सिद्ध करते. अशाच एका पदार्थांविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. हा पदार्थ जवळपास प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाकघरात असतो. ज्याचा आकार लहान आणि रंग काळा असला तरीही आरोग्यदायी गुणधर्मांमुळे हा पदार्थ आयुर्वेदातही महत्वाच्या स्थानावर आहे. हा पदार्थ म्हणजे कलोंजी.
कलोंजी म्हणजे काय? (Kalonji Seeds Benefits)
कलोंजीला इंग्रजीत ‘ब्लॅक सीड्स’ किंवा ‘नायजेला सीड्स’ असे म्हणतात. या पदार्थाचे वैज्ञानिक नाव नायजेला सॅटिवा असे आहे. आयुर्वेदात हा पदार्थ गेल्या अनेक शतकांपासून औषधी बनवण्यासाठी वापरला जात आहे. या पदार्थाचे सेवन केल्यास शरीरात लपलेल्या व्याधी आणि आजार दूर होतात. अर्थात आकाराने लहान रंगाने काळा असा हा पदार्थ स्वतःच एक औषध आहे. त्याचे सेवन केल्यास बरेच आजार दूर पळून जातात. यासाठी कलोंजीचे सेवन कसे करावे आणि त्याचे फायदे काय ते जाणून घेऊया.
असे करा कलोंजीचे सेवन
आरोग्यदायी फायद्यांसाठी १/२ चमचा कलोंजी १ चमचा मधात मिसळून सेवन करता येईल. (Kalonji Seeds Benefits) याशिवाय १ कप गरम पाण्यात कलोंजीच्या १/२ चमचा बिया भिजवूनदेखील त्याचे सेवन करता येईल. तसेच विविध भाज्यांमध्येदेखील या बिया घालून त्यांचे सेवन करणे लाभदायी ठरेल. अगदी सॅलडमध्येसुद्धा कलोंजी मिसळून खाता येईल. कलोंजीचे सेवन केल्यास मिळणारे फायदे खालीलप्रमाणे:-
1. उच्च रक्तदाबावर नियंत्रण
कलोंजीचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब नियंत्रित करता येतो. वास्तविक हा पदार्थ शरीरात लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून काम करतो. ज्यामुळे मज्जासंस्थेची अतिक्रियाशीलता कमी होते आणि परिणामी उच्च रक्तदाबाची पातळी कमी होण्यास मदत होते. परंतु काही प्रकरणांमध्ये याचे सेवन करण्याआधी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. (Kalonji Seeds Benefits)
2. मधुमेहावर प्रभावी
शरीरात साखरेची पातळी कमी करण्यासाठी कलोंजीच्या बियांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. (Kalonji Seeds Benefits) त्यामुळे ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास असेल त्यांनी कलोंजीचे सेवन केल्यास रुग्णांच्या शरीरातील इन्सुलिनची प्रक्रिया सुधारू शकते.
3. दम्यावर परिणामकारक
कलोंजीचे सेवन केल्यास ब्रॉन्किओल्स उघडतात. ब्रॉन्किओल्स म्हणजे फुफ्फुसांमध्ये पसरलेल्या लहान नळ्या. ज्यातून फुफ्फुसाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हवा जाते. जेव्हा ब्रॉन्किओल्स उघडले जातात तेव्हा श्वासोच्छवास सामान्य होतो आणि दम्यासारख्या आजारांवर नियंत्रण मिळवता येते. मात्र याचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
4. संसर्गापासून सुरक्षा (Kalonji Seeds Benefits)
जे लोक सतत आजारी पडतात अशा लोकांनी आपल्या आहारात आवर्जून कलोंजी खावी. यातील औषधी घटक संसर्गापासून बचाव करतात. यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. यामुळे संसर्गजन्य रोगांपासून सुरक्षा मिळते.
5. अॅलर्जीपासून सुटका
कलोंजीतीळ अँटी बॅक्टेरियल गुणधर्म अॅलर्जी दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. त्यामुळे जर तुम्हीही एखाद्या अॅलर्जीने हैराण असाल तर कलोंजीचे सेवन जरूर करा. पण त्याआधी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या. (Kalonji Seeds Benefits)