केन विल्यमसनने कर्णधारपद सोडले; NZ क्रिकेटला धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्युझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार आणि दिग्गज फलंदाज केन विल्यमसनने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे . न्युझीलंड क्रिकेटने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे. मात्र, विल्यमसन वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करत राहील आणि त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

कसोटीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे. कसोटी संघाचं कर्णधारपद भूषवणं हा माझ्यासाठी बहुमान आहे. आगामी २ वर्षात २ विश्वचषक स्पर्धा आहेत, त्यामुळे मला त्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. मी कर्णधार म्हणून टिम साऊथी आणि उपकर्णधार म्हणून टॉम लॅथम यांना पाहण्यास उत्सुक आहे. माझ्या कारकिर्दीचा बराचसा काळ या दोघांसोबत घालवल्यानंतर, मला माहित आहे की ते चांगले काम करतील.

दरम्यान, विल्यमसनच्या जागी आता अनुभवी गोलंदाज टीम साऊदी न्यूझीलंड कसोटी संघाची कमान सांभाळताना दिसणार आहे. केन विल्यमसन हा न्यूझीलंडच्या यशस्वी कसोटी कर्णधारांपैकी एक आहे. 2016 मध्ये ब्रेंडन मॅक्क्युलमनंतर विल्यमसनकडे संघाची कमान सोपवण्यात आली होती. त्याने आपल्या नेतृत्त्वाखालील 38 कसोटी सामन्यांमध्ये 22 वेळा संघाला विजय मिळवून दिला. याशिवाय विल्यमसनच्या नेतृत्त्वाखालीच न्युजीलँडच्या संघाने कसोटी विजेतेपद पटकावलं होतं. एक कल्पक कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते.