कंगनाने केली कोरोनावर मात; इंस्टाग्रामवर ट्रोलर्सला टोमणा देत चाहत्यांसाठी केला खास व्हिडीओ पोस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री कंगना रनौतला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. पण तिने आता कोरोनावर मात केली आहे. या बाबतची माहिती तिने स्वतः आपल्या सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर कंगनाने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने कोरोनावर मात कशी केली हे सांगायचे आहे पण सांगणार नाही कारण कोविड फॅन क्लब दुखावेल असा नेटकऱ्यांना तिखट आणि खोचट असा टोमणा मारला आहे. पण तरीही आपल्या इतर चाहत्यांसाठी तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिने स्वतःचा अनुभव सांगत काही प्रेरणादायी गोष्टी शेअर केल्या आहेत.

पोस्ट शेअर करताना ती म्हणाली, तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि आशिर्वादामुळे मी कोरोनामुक्त झाले आहे. मी कोरोनाला कश्या पद्धतीने हरवू शकले याबद्दल मला खूप काही सांगायचे आहे. पण मला कोविड फॅन क्लबला दुखवायचे नाही म्हणत पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे. जर आपण विषाणूबद्दल काही अनादर दाखवला तर काही लोक खरोखरच दुखावले जातात. तुमच्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. ”

https://www.instagram.com/tv/CPAbpb1hYMn/?utm_source=ig_web_copy_link

यानंतर तिने शेअर केलेल्या व्हिडिओत तिने म्हटले आहे कि, नमस्कार मित्रहो आज माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला आहे जो निगेटिव्ह आहे, आजपासून काही दिवस आधी माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी म्हटले होते कि मी या विषाणूला ठरवेन तर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. अनेकजण दुखावले होते. मला याबाबत त्यांना वाटतंय तास नकीच काही बोलायचं नव्हतं. त्यानंतर माझ्या बहिणीने मला प्रेरणा दिली. ती म्हणाली कि लोकांच्या मनात आलं तर ते तुम्हाला श्वास हि घेऊन देणार नाहीत पण अश्या लोकांकडे दुर्लक्ष करून तुम्ही इतर लोकांसाठी प्रेरणा व्हा.

https://www.instagram.com/p/COE4eZnhHCV/?utm_source=ig_web_copy_link

पुढे, सर्व प्रथम आपल्याला घाबरायचं नाही आहे. आपल्या मनस्थितीला तीन भागांत वाटून घ्या. शारीरिक, मानसिक आणि भावनिक. कारण एखाद्या प्रोम्ब्लेमला आपण स्वतःच मोठे करत असतो. शारीरिक स्थैर्यासाठी काळीमिरी, ओवा आणि तुळशीच्या पानांचा काढा घ्या. योगासन करा. तर मानसिक स्थैर्यासाठी प्राणायाम करा. स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. डिजिटल गोष्टींपासून, त्याच त्याच बातम्यांपासून दूर राहा. भावनिकी स्थैर्यदेखील या सगळ्यात महत्वाचे असून त्याकरिता नकारात्मक गोष्टींपासून अंतर ठेवा. अशा आशयाचा व्हिडीओ बनवून कंगनाने आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट केला आहे.

https://www.instagram.com/p/CN1sIUkBRhA/?utm_source=ig_web_copy_link

जेव्हा कंगनाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता तेव्हा तिने कोरोनाची लागण झाल्याची माहिती देखील सोशल मीडियावर शेअर केली होती. मी स्वत: ला क्वारंटाइन केले आहे, मला कल्पना नव्हती की या विषाणूने माझ्या शरीरात शिरकाव केला आहे. मला माहिती आहे की विषाणूला मी हरवेन. असा विश्वासच त्यावेळी तिने व्यक्त केला होता. कृपया तुमच्यावर कोणत्याही गोष्टींचा परिणाम होऊ देवू नका. ज्या गोष्टीपासून तुम्ही जास्त घाबरलात ती गोष्ट तुम्हाला अधिक घाबरवेल. उगाचच आपण त्याला जास्त महत्त्व दिले आहे. हा केवळ एक छोटासा फ्लु आहे. चला तर मग आपण सगळे मिळून कोविड -१९ ला नष्ट करूया .हर हर महादेव.

Leave a Comment