हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र अन कर्नाटक या दोन राज्यांच्यामध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होताना दिसतात. आता पुन्हा एकदा अशाच वादाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. काही कन्नड लोकांनी महाराष्ट्राच्या बसच्या कंडक्टरला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यासोबतच त्यांनी एसटीला काळ फासले आहे. तर हि नेमकी घटना काय आहे आणि कर्नाटकमधील कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी असं का केलं हे आज आपण जाणून घेणार आहोत.
कन्नड येत नाही म्हणून मारहाण –
पुणे-बंगळुरु महामार्गावर, चित्रदुर्ग जिल्ह्यात हि घटना घडली आहे. कन्नड कार्यकर्त्यांनी एसटी बसच्या चालकाला कन्नड येते का ? असा प्रश्न विचारला पण त्याला कन्नड येत नसल्यामुळे कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी कंडक्टर आणि बसवर हल्ला केला आहे. लोकांनी त्याच्या तोंडाला काळे फासून बसला देखील काळे फासले आहे. या घटनेमुळे सर्व महाराष्ट्रात संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे अजून एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कठोर कारवाईची मागणी –
हि घटना जरी आता घडली असेल तरी यापूर्वी असंख्य घटना घडल्या आहेत. 2022 च्या डिसेंबर महिन्यात, बेळगावच्या हिरेबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केला होता. या घटनेमुळे वाहनांचे प्रचंड नुकसान झाले होते. या प्रकरणावरून दोन्ही राज्यांमध्ये अनेकदा हिंसक आंदोलने आणि वाद निर्माण झाले आहेत. राजकीय वाद आणि सीमावादाच्या प्रश्नामुळे राज्यांमध्ये तणाव आहे. आता या नवीन हल्ल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा संताप वाढत निघाला आहे. महाराष्ट्र सरकारने कर्नाटकमधील सरकारकडून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.