कराड प्रतिनिधी | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 23 जणांनी अर्ज मागे घेतले. तर 17 जागांसाठी 34 जण रिंगणात असल्याने दुरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. स्वर्गीय लोकनेते विलासराव पाटील (काका) रयत पॅनलचे अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
कराड बाजारसमितीचे रोजचे बाजारभाव तुम्हाला मोबाईलवर कसे मिळतील?
शेतकरी मित्रांनो आता आपल्याला कराड बाजारसमितीमधील रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवता येणार आहेत. यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. या अँपवर आपल्याला कराड बाजारसमितीमधील रोजचे बाजारभाव घरी बसून पाहता येतात. यामुळे कोणत्या दिवशी कशाला किती रुपये दर मिळाला याची माहिती उपलब्ध होते. आपल्याला योग्य तो दर मिळत असेल तरच आपला शेतमाल बाजारसमितीत घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यास या अँपचा फायदा होतो. यासोबतच सातबारा उतारा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, सरकारी योजना, जमीन खरेदी विक्री आदी सेवाही या अँपवर विनामूल्य देण्यात येत आहेत. आजच तुम्हीसुद्ध Hello Krushi डाउनलोड करून या उपक्रमाचे लाभार्थी बाणा.
रयत पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे :-
सोसायटी मतदारसंघ सर्वसाधारण गटातून :- विजयकुमार सुभाष कदम, मोहनराव एकनाथ माने, अशोक बाबुराव पाटील, दीपक (प्रकाश) आकाराम पाटील, शैलेश उत्तमराव चव्हाण, प्रमोद बाळासो कणसे, वामन संतराम साळुंखे
- महिला राखीव गटातून :- विजयमाला रामचंद्र मोहिते, इंदिरा बाबासो जाधव- पाटील
- भटक्या विमुक्त जाती :- संभाजी श्रीरंग काकडे
- इतर मागास प्रवर्गातून :- सर्जेराव रामचंद्र गुरव
- ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटातून :- संभाजी लक्ष्मण चव्हाण, राजेंद्र रमेश चव्हाण
- आर्थिक दुर्बल गटातून :- शंकर दिनकर इंगवले
- अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून :- नितीन भीमराव ढापरे
- व्यापारी अडते मतदारसंघातून :- जयंतीलाल चतुरदास पटेल, जगन्नाथ बळी लावंड.
कराड बाजार समितीच्या निवडणुकीत का ंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्व. विलासराव पाटील (काका) रयत पॅनेल आणि माजी सहकार मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डा. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनेल यांच्यात दुरंगी लढत होणार आहे.