विद्यानगर मधील कॉलेज परिसरातील कॅफेंवर पोलिसांची धडक कारवाई

Amol Thakur Coffee Cafe
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड शहरासह, मलकापूर व विद्यानगर परिसरातील कॅफेंवर कराडचे नूतन डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शनिवारी दुपारी धडक कारवाई केली. यावेळी तब्बल 15 युवती व 15 युवकांसह 4 कॅफे चालकांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर युवक- युवतींच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समुपदेश करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहराचा डीवायएसपी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नवीन डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी शनिवारी पहिलीच धडक कारवाई केली. डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी शहरात पहिल्यांदा टार्गेट केले ते बेकायदेशीर कॉफी कॅफे व त्यामध्ये बसून गैरकृत्य करणाऱ्या युवक-युवतींना. कराड, मलकापूरसह विद्यानगर येथे अनेक बेकायदेशीरपणे कॅफे असून याठिकाणी काही गोष्टी घडत असल्याची माहिती डीवायएसपी अमोल ठाकूर यांना मिळाली होती. युवक-युवतींच्या अशा प्रकारांवर आला घालण्यासाठी अशा कॅफेंवर कारवाई करण्याची स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती. त्यानुसार डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र पुजारी, वाहतूक शाखेच्या सरोजिनी पाटील यांच्यासह 15 जणांचे पथक तयार केले. या पथकामार्फत कराड, मलकापूरसह विद्यानगर परिसरातील कॅफेवर धडक कारवाई करण्यात आली.

यावेळी पोलिसांनी तब्बल 15 युवती व 15 युवकांसह 4 कॅफे चालकांना ताब्यात घेत त्यांना कराड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. अचानकपणे पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे कॅफे चालवणाऱ्या व्यवसायिकांच्यात खळबळ उडाली आहे. कराड येथे नुकतेच रुजू झालेल्या डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी केलेल्या पहिल्याच धडक कारवाईमुळे कॅफे चालकांचे धाबे दणाणले आहे.