कराड जनता सहकारी बँकेनं केलं तब्बल १८१ कोटींचं विनातारण कर्जवाटप; ठेवीदार आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड जनता बँकेकडून १८१ कोटी विनातारण कर्जवाटप केल्याचे समजताच ठेवीदारांनी कर्मचार्‍यांना बँकेतून हाकलून लावलं. २३ तारखेपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास बँकेसमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ठेवीदारांनी दिला.

कराड जनता सहकारी बँकेत ठेवलेल्या ठेवी गेल्या अडीच वर्षापासून मिळत नसून कोणताच ठोस निर्णय होत नसल्याने ठेवीदारांनी मुख्य कार्यालयासमोर ठिय्या मांडला. बँकेचे कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाने कोणतेही तारण न घेता १८१ कोटी रूपये महिपतराव रामचंद्र फडतरे ग्रुपला दिल्याचे सांगितल्याने ठेवीदारांनी बँकेच्या कर्मचार्‍यांना हाकलून बाहेर काढले. बँकेचे प्रशासक तसेच संचालक मंडळातील कोणीही याठिकाणी फिरकले नाही.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.