कराडच्या 24×7 पाणीप्रश्नी उपाययोजना कराव्यात, अन्यथा काॅंग्रेस रस्त्यावर उतरणार; ऋतूराज मोरे

Karad Congress Rituraj More
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड शहराला चोवीस तास पाणीपुरवठा होण्यासाठी 2007 सालापासून रखडलेली योजना अंतिम टप्प्यात आलेली आहे. मात्र, आता पाणी बिलावरून ही योजना चर्चेत आलेली आहे. वर्षभरात 2 हजार येणारे पाणी बिल चक्क 10 ते 12 हजारांच्या घरात गेल्याने शहरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. कराड पालिकेत प्रशासक असल्याने प्रशासनाने लवकरात लवकर योग्य उपाययोजना कराव्यात अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू. असा इशारा कराड काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतूराज मोरे यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

कराड काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतूराज मोरे यांच्यावतीने आज मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कराड शहरात पालिकेच्यावतीने चोवीस तास पाणी पुरवठ्याची योजनेचि कामे सुरु आहेत. शहरात पाणी बिले पालिकेकडून घेतली जात असून कामे मात्र पूर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्हाला योग्य ती माहिती देऊन कामे तत्काळ पूर्ण करावीत, अन्यथा शहरात काँग्रेसकडून आंदोलने केली जातील अशा इशारा आम्ही दिला आहे. पालिकेकडून आम्हाला येत्या 30 जानेवारी बैठक घेण्याचाही आश्वासन देण्यात आलेले आहे.

पालिकेने पाणी प्रश्नाबाबत नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात. शहरासाठी चोवीस तास पाणी योजना गरजेची आहे. परंतु त्याकरिता नागरिकांच्यावर अन्याय होता कामा नये. यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आम्ही पालिकेचे मुख्यधिकारी रमाकांत डाके यांच्याकडे केली आहे.

गेल्या वर्षभरात ही योजना कार्यान्वित होण्या अगोदर मीटर प्रमाणे बिल आकारणी करण्यास सुरूवात केली गेली. सध्या, सकाळ व संध्याकाळ असे 2 वेळात मीटरप्रमाणे पाणी सोडले जात आहे. वर्षभरात 2 हजार येणारे पाणी बिल चक्क 10 ते 12 हजारांच्या घरात गेल्याने शहरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. कराड पालिकेत प्रशासक असल्याने राजकीय पक्षांनीही मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना निवेदन दिलेली आहेत.