कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत दि. 8 ऑक्टोंबर रोजी रताळी तेजीत आहेत. (कराड बाजार भाव) तर नवरात्र संपल्यानंतर आता पालेभाज्याचे दर गडगडले आहेत. रताळी 250 ते 300 रूपये प्रति 10 किलोचा दराने आला आहे. हिरवा वाटाणा, पावटा व शेवगाच्याही दर मार्केटमध्ये उतरण्यास सुरूवात झाला आहे.
नवरात्री उत्सवात कोथींबिर प्रतिशेकडा 500 ते 1200 रूपये होती. आज 100 ते 500 रूपये दर आहे. मेथी 1200 ते 1500 रूपयांवरून थेट 100 ते 300 रूपयावर आली आहे. पालक 1000 ते 1500 रूपयांवरून थेट 200 ते 300 रुपयांवर घसरली आहे. शेपू 800 ते 1000 रूपयांवरून थेट 200 ते 250 रुपयांवर घसरली आहे. लिंबूचे दर मात्र मार्केटमध्ये जैसे थे आहेत. (कराड बाजार भाव)