कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड परिसरात ऊसाचे उत्पन्न जास्त असले तरी आता शेतकऱ्यांचा सोयाबीन, गहू, ज्वारी, हरभरा असे पीक घेण्याकडे कल वाढत आहे. उत्पादित केलेल्या मालात कचरा, खडे असतील तर उत्पादित मालाला भाव कमी मिळतो. शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची निकड लक्षात घेऊन 5 मेट्रीक टन प्रतितास क्षमता असलेल्या धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणा कार्यन्वीत करण्यात आली आहे, याचा कराड परिसरातील शेतकरी व धान्य व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार, पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
कराड येथील मार्केट यार्डमध्ये धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे सचिव रमेश शिंगटे, वसंतराव पाटील(बापू), लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील(काका), कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, चंद्रकांत हिंगमीरे, रेळेकर साहेब, माजी विभागीय उपायुक्त तानाजीराव साळुंखे, उपनिबंधक सहकारी संस्था कराड संदीप जाधव, कराड नगरपरिषदडचे विरोधीपक्षनेते सौरभ पाटील, अख्तर अंबेकरी, हेमंत ठक्कर, भाऊसाहेब शिंदे, माणिकराव पाटील, दाजी पवार, लालासाहेब पाटील, शिवाजी पवार, वैभव हिंगमीरे, देवेंद्रभाई संगोई, रवींद्र मुंढेकर, बजरंग पवार, प्रदीप पवार, जयवंत मोहिते, अनुज पाटील, संजय साळुंखे, बापूसो साळुंखे, संतोष पाटील, तुषार कदम, पिराजी पवार, संजय घोलप, पिनु जाधव तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व वखार महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना 1957 मध्ये करण्यात आली. याला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी गती दिली. वखार महामंडळाची 1 हजार 190 गोदामे आहेत. यामध्ये पनवेल व सांगोला येथे शितगृहे आहेत. सर्व गोदामांची साठवणूक क्षमता 21.83 लाख मे. टन इतकी आहे. या गोदामांमध्ये शेतकऱ्यांना राखीव जागा उपलब्ध करुन दिली जाते. महामंडळातर्फे शेतकऱ्यांना 7/12 उताऱ्यावर 50 टक्के साठवणूक आकारात सवलत दिली जाते. तसेच मालाची शास्त्रशुद्ध साठवणूक केली जाते व शंभर टक्के विमा संरक्षणाबरोबर 75 टक्क्यांपर्यंत अल्पदराने त्वरीत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.