कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील डिचोली गावच्या हद्दीत सोमवारी सकाळी अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या गळ्यावरती गंभीर स्वरुपाच्या जखमा असल्याने व कॉल डिटेल्स वरून तिचा प्रेम प्रकरणातून खून झाला असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होत आहे. याबाबतची फिर्याद तिच्या नातेवाईकांनी शहर पोलिसात दिली असून याप्रकरणी आत्महत्या केलेल्या युवकावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, गुरूवार दि. 10 डिसेंबर रोजी कराड शहरातील एका युवकाचा मृतदेह टेंभू गावच्या हद्दीत कृष्णा नदी पात्रात आढळून आला होता. मृतदेहाशेजारी ब्लेड व बँडेज असे साहित्य आढळून आले होते. त्या दिवसापासून संबंधित अल्पवयीन मुलगीही बेपत्ता होती. याबाबतची खबर कुटूंबियांनी शहर पोलिसात दिली होती. पोलिस त्या अनुषंगाने तिचा शोध घेत होते.
सोमवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास डिचोली गावच्या हद्दीत डोंगराकडील बाजूच्या कोपर्या शेताजवळील काढलेल्या सिमेंटच्या रिकाम्या गटरमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहचे शवविच्छेदन केले असता गळ्याला गंभीर जखम असल्याने तिचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होत आहे. याबाबत मृत मुलीच्या नातेवाईकांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्या केलेल्या युवकावर खूनाचा गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे करीत आहेत.
Big News
कराडमधील 'त्या' खून प्रकरणी तिघे अल्पवयीन ताब्यात; कराड शहर पोलिसांची केवळ ३ तासात कारवाई
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/Ui08BLISry#karad #HelloMaharashtra. #crime— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 16, 2020
Big News
कराडमध्ये धारदार शस्त्राने वार करून डोक्यात फरशी घालून एकाचा निघृण खून; मंडई भागातील घटना; ३ संशयित पसार
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/Gfk2hNh5wU#HelloMaharashtra #karad #bignews— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 16, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’