कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये सलग दुसऱ्या वर्षी नगरपालिका गटात कराड नगरपालिका सलग दुसऱ्या वर्षी अव्वल आली असून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियान पुरस्कार सोहळा आज मुंबई येथे झाला.
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे यावेळी उपस्थित होते. या समारंभात पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, विजय वाटेगावकर यांनी हा पूरस्कार स्विकारला. यावेळी मुकादम सूरेश शिंदे, रोकडे, नदाफ हे उपस्थित होते. पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्व वर आधारित माझी वसुंधरा अभियान सलग दुसऱ्या वर्षी राज्यात राबवण्यात आले. गतवर्षी कराड नगरपरिषदेने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता. या वर्षीही नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियानात मोठ्या प्रमाणात शहरात काम केले.
मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी या अभियानात विविध उपक्रम राबवत पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचातत्वावर अनेक उपक्रम हाती घेत शहरात हजारो झाडांची वृक्षारोपण ही केले. नदी स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवड अशा विविध प्रकारची कामे शहरात करण्यात आली.