कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाग्रस्तांव्या वाढत्या संख्येमुळे सरकार आणि वैद्यकीय क्षेत्रावर ताण आला आहे. अशा संकटाच्या वेळी कराड शहरातील मुस्लिम समुदायाने कोविड हॉस्पिटलची उभारणी करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
कराड शहरातील मुस्लिम समाजाने कराडच्या वारणा हॉटेलमध्ये 50 बेड चे कोव्हीड सेंटर सुरु केले असुन यामध्ये 28 व्हॅंटिलेटर बेडची सुविधा उपलब्ध केली आहे. राज्याचे सहकारमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आज या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन पार पडले. कराडच्या मुस्लिम समुदायाने चांगले काम केले असून राज्यातील प्रत्येक समाजाने पुढे यावे, असे आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, कराड शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने मुस्लिम समाजाने पुढाकार घेत कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतल्याचे समजतेय. या कोव्हीड सेंटरचा लोकार्पण सोहळा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील जिल्हाधिकारी शेखरसिंग यांचे हस्ते झाल।