सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
जम्मू -काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर झालेल्या चकमकीत सशस्त्र पाकिस्तानी घुसखोरांशी लढताना लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत. शहीद झालेल्यापैकी कराड तालुक्यातील मुंढे गावचे रहिवाशी संदीप रघुनाथ सावंत वय २९ यांचा समावेश आहे.
शहिद संदीप सावंत यांना दीड महिन्याची मुलगी असून १५ दिवसापुर्वीच तिचे बारसे करुन संदिप सीमेवर दाखल झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी ,आई-वडील मोठा भाऊ असा परिवार आहे.
शहिद संदीप सावंत यांना सीमेवर वीरमरण आल्याने मुंढे गावावर एकीकडं शोककळा पसरली आहे तर दुसरीकडे संपूर्ण गावाला त्यांचा अभिमान वाटत आहे. शहीद सावंत यांचे पार्थिव गावात कधी पोहचेल याची नेमकी वेळ माहित नाही परंतु गावकऱ्यांनी अतिंम संस्काराची तयारी सुरु केली आहे.