कराड नगरपालिकेत पतींच्या उचापती काढण्यावरून नगराध्यक्षा व नगरसेविकांच्यात जोरदार खंडाजगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड नगरपालिकेच्या विशेष सभेत पतीच्या उचापती काढण्यावरून नगराध्यक्षा व नगरसेविकांच्यात जोरदार खंडाजगी झाली. सभेतील विषय क्रमांक 11 मध्ये विविध कामासाठी घेतलेल्या निर्णयास कार्योत्तर मंजूरीस अंतीम आरोग्य मंजूरी देणेबाबत आलेल्या कार्यालयीन अहवालाचा विचार करून निर्णय घेणे. या विषयावर ऑनलाईन सभेत जोरदार खडाजंगी झाली.

कराड पालिकेची आज ऑनलाईन विशेष सभा आयोजित केली होती.  यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेविका शारदा जाधव, विद्या पावसकर, अंजली कुंभार, स्मिता हुलवान,  नगरसेवक विनायक पावसकर, राजेंद्रसिंह यादव, साैरभ पाटील, हणमंतराव पवार, राजेंद्र माने, फारूख पटवेकर, अतुल शिंदे, विजय वाटेगावकर आदी उपस्थित होते.

कार्योत्तर मंजूरी देण्याच्या विषयावरून नगरसेविका पल्लवी पवार म्हणाल्या,  श्री. नांगरे आरेरावी व उध्दटपणे बोलत असतात. जिल्हा नियोजनातून जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न केले. मुख्याधिकारी यांनी सांगूनही श्री. नांगरे यांनी माझी विकासकामे शेवटच्या यादीत टाकली. त्यामुळे लोकशाही आघाडीतर्फे हा विषय नामंजूर करत आहोत.

यावर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे नगरसेविका पल्लवी पवार यांचे पती बांधकाम विभागात येवून आरेरावी करून गेले होते, असे म्हणाल्या. यावर प्रत्युत्तर देताना नगराध्यक्षा मॅडम तुमचे पती 24 तास दालनात बसलेले असतात, असा टोला पल्लवी पवार यांनी लगावला. तर नगरसेविका स्मिता हुलवान यांनी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी महिलेचा अपमान केल्याचे म्हणत नगराध्यक्षांचा तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे म्हंटले. शेवटी श्री नांगरे यांचा विषय नामंजूर करीत इतर विषयातील घटकांना मंजुरी देण्यात आली.