कराड पंचायत समितीचे आरक्षण जाहीर : अनेक इच्छुकांच्या आशा गुंडाळल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

कराड पंचायत समितीचे गण निहाय आरक्षण सोडत 2022 पार पडली. प्रातांधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार विजय पवार, नायब तहसिलदार आनंदराव देवकर, मंडलधिकारी युवराज पवार यांच्या उपस्थित लहान मुलांच्या हस्ते आरक्षण सोडत पार पडली. यामध्ये अनेक इच्छुकांच्या दांड्या उडाल्या. तर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असून 14 महिलांनाही संधी मिळेल.

आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे गण निहाय पुढीलप्रमाणे- अनुसूचित जाती प्रवर्ग- काले (महिला राखीव), कोर्टी (महिला राखीव), सुपने (खुला). नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC- आटके (महिला राखीव), चरेगाव (महिला राखीव), वडगाव हवेली (महिला राखीव), कोळे (खुला), इंदोली (खुला), सैदापूर (खुला), सर्वसाधारण महिला-  तळबीड, वारुंजी, वाघेरी, येळगाव, पाल, उंब्रज, कोपर्डे हवेली, मसूर, किवळ. खुला वर्ग – हजारमाची, कोयना वसाहत, कार्वे, उंडाळे, शेरे, ओंड, रेठरे बुद्रुक, गोळेश्वर, तांबवे, विंग.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/773416897038804

पंचायत समितीत मोठा गण व चर्चेत असलेले काले, आटके, वडगाव हवेली, वारूंजी, तळबीड, उंब्रज, कोपर्डे हवेली, मसूर आणि पाल या ठिकाणी महिला अनुसूचित जाती, मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिलेसाठी पडल्याने इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले. काले आणि आटके येथे मी नाही तर साै अशीही परिस्थिती सर्वसाधारण गणातील इच्छुकांच्याकडे राहिली नाही. तर वारूंजी गणात माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांचाही हिरमोड झाला आहे. सुपने गण आणि तांबवे गटातही हिरमोड इच्छुकांचा झाला आहे. कारण सुपने गण आणि तांबवे गट हा अनुसुचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. सुपने येथे दोन टर्म सदस्य राहिलेल्या सुरेखा पाटील यांचाही 10 वर्षांनी आरक्षणामुळे पत्ता कट झाला असून सर्वसाधारण गटातील सुपनेकरांना चांगलाच धक्का बसला आहे. पंचायत समितीच्या गणात तांबवे, उंडाळे, कार्वे, रेठरे आणि विंग येथे आता इच्छुकांची संख्या वाढलेली पहायला मिळणार आहे.