सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
मागील वर्षी आलेल्या गलीबॉय या चित्रपटाने अवघ्या भारतीय चित्रपटसृष्टीला खिळवून ठेवलं होतं. आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी धडपडणाऱ्या झोपडपट्टीतील मुलांची गोष्ट गलीबॉयमध्ये समर्पकपणे दाखवण्यात आली होती. या चित्रपटानंतर देशभरात रॅप गाण्याची चलती दिसून येऊ लागली. वास्तव घडामोडींवर, देशातील बऱ्या-वाईट गोष्टींवर लक्ष केंद्रित करून रॅप गाणं रचले जाऊ लागले. असाच एक प्रयत्न सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील नोमान खान यांनी केला आहे.
केंद्र सरकारच्या घोषणाबाजीवर नोमानने राळ उठवली असून मागील ५ वर्षांचा दाखला देत त्याने हे रॅप सॉंग बनवलं आहे. सबका साथ, सबका विकास, मेक इन इंडिया या योजनांचं पुढं काय झालं हे उपरोधिकपणे तो यातून विचारत आहे. राजकारणी आणि सत्तेची खुर्ची यांचं घनिष्ठ नातंसुद्धा त्यानं यात उलगडून दाखवलं आहे. आझादी कैद हैं! या नावाने नोमानने हा व्हिडिओ बनवला असून नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात उसळलेल्या जनक्षोभानंतर सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पहा विडिओ-
महाराष्ट्रच्या कानाकोपर्यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News