कराडमध्ये शिवसेना महिला आघाडीकडून अमृता फडणवीसांच्या फोटोला जोडे मारत ट्विटचा निषेध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या ट्विटमुळे चांगलेच वातावरण पेटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसैनिकांबद्दल केलेल्या ट्विटचा निषेध शिवसेना कार्यकर्त्यांकडून नोंदविण्यात येत आहे.

त्याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडीकडून अमृता फडणवीस यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले आहे.

कराड दक्षिण उत्तरच्या महिला आघाडी प्रमुख सुवर्णा शेवाळे, सातारा महिला आघाडी प्रमुख चित्रा महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कराड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले आहे.