कामबंदचा इशारा : कराडला तलाठी संघटनेकडून समन्वयक आयुक्ताचा निषेध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पुण्याचे जमाबंदी समन्वयक आयुक्त रामदास जगताप यांनी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या अध्यक्षाना अपमानास्पद अर्वाच्य भाषेत बोलल्याबदल सातारा जिल्हा तलाठी संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन करत निषेध व्यक्त केला. समन्वयक आयुक्त यांच्यावर कारवाई न झाल्यास संपुर्ण राज्यभर तलाठी कामबंद आंदोलन करतील असा इशारा तलाठी संघटनेचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी संघटनेच्यावतीने दिला आहे

कराड येथील तहसील कार्यालया समोर तलाठी संघटनेच्यावतीने घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी सरचिटणीस दादासाहेब देशमुख, मंडलाधिकारी प्रशांत कोळी, शशिकांत वाघमारे, तलाठी राजेंद्र मोहिते, सचिन ढवण, सचिन निकम, दादासाहेब कणसे, शिवभूजे मॅडम, जाधव मॅडम आदी उपस्थित होते.

संतोष जाधव म्हणाले, महसूल खात्याच्या कामकाजाबाबत संघटनेच्या व्हाॅटसग्रूपवर तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी मेसेज टाकला होता. समन्वय यांनी मेसेजचा चुकीचा अर्थ लावत अर्वाच्य भाषा वापरली होती. तेव्हा या भाषेचा आम्ही निषेध करत आहोत. आम्ही कराड तालुका संघटनेच्यावतीने निषेध करण्यात आला. समन्वयक आयुक्त रामदास जगताप यांची बदली न झाल्यास आपत्ती कामे सोडून उद्यापासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल.

Leave a Comment