कराड | आश्वासित प्रगत योजने (CAS) अंतर्गत मिळणाऱ्या लाभापासून अभियांत्रिकी शिक्षकांना वंचित ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढलेला दिनांक 3 जून 2022 रोजीचा आदेश (GR) हा सर्व अभियांत्रिकी शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व अभियांत्रिकी शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शिक्षक संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रभर मेटा ने निषेध केला.
कराड येथे महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक संघटनेच्या (META) वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात निदर्शने करण्यात आली. यावेळी शिक्षकांनी जोरदार घोषणा देत शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली. यावेळी शिक्षकांनी आमच्या मागण्या मान्य करा, एकजूटीचा विजय असो, अशा घोषणा दिल्या.
यावेळी निदर्शनात सर्व अभियांत्रिकी शिक्षक सहभागी झाले होते. संघटनेचे प्रमुख प्रा. डॉ. एस. के. पाटील, प्रा. एस. व्ही. पाटील, प्रा. डॉ. एल. एल. कुमारवाड, प्रा. कृष्णा अळसुंदकर, प्रा. भूषण येलुरे, प्रा. अमरसिंह लांडगे यांनी विशेष प्रयत्न केले.