कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
छ. शिवाजी महाराजांचे थेट वंशज व सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय नेतृत्व श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यदिव्य बैलगाड्या शर्यतीच्या आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा परितोषिक वितरण समारंभ श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांच्या शुभ हस्ते होणार असून यावेळी आ. महेश लांडगे, आ.जयकुमार गोरे, डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर, माजी आ. आनंदराव पाटील, माजी महापौर दीपकभाऊ मानकर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती विजयसिंह यादव यांनी दिली.
स्पर्धेची माहिती देताना श्री. यादव पुढे म्हणाले, राजेंद्रसिह यादव मित्र परिवार व विजयसिह यादव मित्र परिवाराच्यावतीने बुधवार (दि. 1 मार्च) सकाळी 9 वाजता हजारमाची (ता. कराड) येथे संपन्न होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बैलगाडीस प्रति 1 हजार रुपये फि भरावी लागेल. तसेच स्पर्धेत यशस्वी बैलगाड्यांना पुढील प्रमाणे रोख रक्कम व करंडक देण्यात येणार आहेत. विजेत्या बैलगाड्यांना प्रथम क्रमांक- 71 हजार 111, व्दितीय क्रमांक- 51 हजार 111, तृतीय- 31 हजार 111, चतुर्थ क्रमांक- 21 हजार 111, पाचवा क्रमांक- 15 हजार 111, सहावा क्रमांक- 10 हजार 111, सातवा क्रमांक- 7 हजार 111 अशी बक्षीसे असणार आहेत.
स्पर्धेत सहभागी बैलांची चारापाण्याची व वैद्यकीय सुविधेची व्यवस्था करण्यात आली असून अत्यंत पारदर्शक पद्धतीने या स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे नमुद करुन सातारा, सांगली , कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यातील सर्व बैलगाडी धारकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे अवाहन संयोजक विजयसिह यादव यांनी केले आहे. स्पर्धेतील सहभागासाठी राजाभाऊ सूर्यवंशी (9665966594), सिद्धार्थ कांबळे (8390606606), योगेश पळसे (9975805050) यांच्याशी संपर्क साधावा.