कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर असणाऱ्या प्रीतिसंगम बाग परिसराची मोठी दुरावस्था झाली आहे. या कामांकडे कराड पालिकेचे पुर्णपणे दुर्लेक्ष झाले असून लहान मुलांच्या खेळण्यांची मोडतोड झाल्याने मुले खेळताना त्यांना दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाली. या ठिकाणी असलेल्या खेळण्याच्या साहित्याची पालिकेकडून तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी कराड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांनी केली आहे.
कराड येथील स्व.यशवंतराव चव्हाण समाधी स्थळाजवळ असणाऱ्या प्रीतिसंगम बागेतील खेळण्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या बागेच्या नुतनीकरणासाठी अनेकवेळा निधी उपलब्ध झाला तरीही बाग सुस्थितीत होताना दिसत नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दररोज शहरासह बाहेरून हजारो पर्यटक भेट देतात.
कराडच्या यशवंतराव चव्हाण समाधीस्थळावरील बागेतील खेळण्यांची दुरावस्था
नगरपालिकेचे दुर्लक्ष : पालिकेच्या दुर्लक्षित कारभाराविरोधात नागरिक, पालक आक्रमक pic.twitter.com/W0uPfNZ4CJ
— santosh gurav (@santosh29590931) March 14, 2023
तरीसुध्दा या बागेकडे कराड नगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. या बागेत असणाऱ्या लहान मुलांच्या खेळण्यांची मोडतोड झाली आहे. पालिकेकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबत पालकवर्गातूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी खेळण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांना गंभीर दुखापत झाल्यास याला पालिकेस जबाबदार धरायचे का? असा सवाल पालक वर्गातून उपस्थित केला जात आहे. परिणामी येथील बागेतील खेळण्यांची लवकरात लवकर पालिकेने दुरुस्ती करावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.