कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराडचे प्रसिध्द शहा बंधू किराणा दूकानचे मालक अनिलशेठ शहा यांचे जावई डाॅ. अक्षय शहा व मुलगी नमिता शहा या दाम्पत्यांनी भारतातील कोरोनाग्रस्तांना आॕक्सिजन मिळावा, यासाठी एक छोटीसी मदत म्हणून तब्बल दहा लाख रूपयांची मदत दिली आहे. शहा दाम्पत्य सध्या लंडन येथे वास्तव्यास आहे.
अक्षय शहा मूळचे ठाणे येथील आहेत. भारतात सध्य परिस्थितीत आॕक्सिजनच्या संकटाला अनेकाला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी आपल्या देशातील लोकांना सामाजिक भावनेतून मदत करण्याच्या उद्दात हेतून अक्षय शहा व नमिता शहा यांनी अक्षपात्र या भारतीय संस्थेला तब्बल दहा लाख रुपये देणगी दिली आहे. तर अजूनही येणाऱ्या काही दिवसांत लंडनमधील भारतीय मित्राच्या सहाय्याने अर्थिक मदत कोरोनाग्रस्तांसाठी करण्याचा मानस शहा दाम्पत्यांने केला आहे.
अक्षयपात्र संस्थेचे माहीती
अक्षयपात्र ही संस्था गरिब, गरजू लोकांच्यासाठी काम करत आहे. या संस्थेची 12 राज्यात काम करत असून 14 हजार 702 शाळांमध्ये जवळपास 17 लाख विद्यार्थ्यांना मोफत जेवण दिले जात आहे. या संस्थेची 2009 मध्ये लिम्का बुक आॅफ रेकार्डमध्ये नोंद घेतली आहे. तसेच सामाजिक योगदानाबद्दल सीएनबीसी सन्मानित केले आहे. या संस्थेचे मुख्य कार्यालय बेंगलूर येथे आहे.
जावयाची देशप्रेमातून मदत ः अनिल शहा
माझे जावई डाॅक्टर आहेत. तेसुध्दा कोव्हीडचे पेशंट बघत आहेत. परंतु आपल्या देशातील परिस्थिती त्यांना माहिती मिळाल्यानंतर सामाजिक बांधिलकीतून मदत केली. यापुढेही मित्रांच्या सहाय्याने ते आणखी आपल्या देशाला मदत देणार आहेत. त्यांची भारत देशाविषयी जवळीकता आहे. आपला देशाविषयी त्यांना प्रेम आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी अशाप्रकारे मदत करावी, असे आवाहन डाॅ. अक्षय शहा यांचे सासरे अनिल शहा यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा