Karjat Dam Projects : मुंबईशेजारील ‘या’ परिसरात उभारण्यात येणार आणखी 2 धरणे; 8 शहरांना होणार फायदा

Karjat Dam Projects
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Karjat Dam Projects। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर मधील नागरिकांचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंगळवारी १८,८४२ कोटी रुपयांच्या चार धरण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील २ धरणांचा समावेश आहे. हि दोन्ही धरणे कर्जत तालुक्यात उभारण्यात येणार आहेत. या दोन्ही धरणाचे पाणी मुंबई महानगर, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांना पाण्यासाठी पुरविले जाणार आहे.

किती TMC क्षमतेची धरणे बांधणार- Karjat Dam Projects

यातील पहिले धरण पोशीर नदीवर बांधण्यात येणार आहे. कुरूंग गावाजवळ पोशीर नदीवर 12.344 टीएमसी क्षमतेचे धरण बांधणे प्रस्तावित आहे. प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा 9.721 टीएमसी आहे. त्यापैकी पिण्यासाठी 7.933 टीएमसी आणि औद्योगिक वापरासाठी 1.859 टीएमसी पाणी वापर प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचे पाणी मुंबई महानगर, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर सारख्या शहरांना पाण्याकरिता पुरविले जाणार आहे. तर दुसरे धरण शिलार नदीवर उभारण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. मौजे किकवी येथे सिल्लार नदीवर 6.61 टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्याचा प्रस्ताव आहे. या योजनेस 4869.72 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचे पाणी मुंबई महानगर, पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका या शहरांना पाण्याकरिता पुरविले जाणार आहे. या दोन्ही धरण उभारणीस मंजुरी मिळाल्याने (Karjat Dam Projects) परिसरातील नागरिकांचा पाणीप्रश्न मिटणार आहे.

दरम्यान, पालघर जिल्ह्यात देहरजी नदीवर वसलेल्या देहरजी धरणाचे काम ८० % पूर्ण झालं आहे. देहरजी धरणाची लांबी २,४५० मीटर असून उंची: ७१.६० मीटर आहे. या धरणाची एकूण साठवण क्षमता ९५.६० दशलक्ष घनमीटर आहे आणि वापरण्यायोग्य साठवणूक क्षमता ९३.२२ दशलक्ष घनमीटर आहे. त्यानुसार, साधारण प्रतिदिन 255 दशलक्ष लिटर इतके पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. २०२७ च्या अखेरीस देहरजी धरण प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आखण्यात आलं आहे. केआयडीसीने 27 जुलै, 2006 रोजी मे. पीव्हीआर प्रोजेक्ट्स लि. यांच्याशी प्रकल्प अंमलबजावणीचा करार केला आणि MMRDA या धरणातून मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर प्रकल्प अहवालावर काम करत आहे.