कडू कारले खाण्याचे हे गोड फायदे

औषधी फायदे
औषधी फायदे
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Hello Health | घरी कारल्याची भाजी केली की तरुण आणि लहान मुले तोंड वाकड करतात. कडू चव असणारे कारले आवडणारे लोक फार कमी असतात. कारले जरी चवीला कडू असले तरी ते आरोग्यास गुणकारी असते.

कारले खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे –

‍१) कारल्यामध्ये फॉस्फरस जास्त प्रमाणात असल्याने कफ कमी होण्यास मदत होते.

२) कारल्याच्या सेवनाने बद्धकोष्ठ बरा होतो आणि स्वच्छाला ही साफ होते. कारल्याच्या सेवनाने रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

३) उलट्या आणि जुलाब होत असल्यास कारल्याचा रस काळे मीठ मिसळून घेतल्यास उलटी जुलाब थांबतात. कारले यकृतास स्वच्छ ठेवते त्यात नवीन पेशी बनण्यास मदत करते.

४) दमा असलेल्या रुग्णांनी मिठाचे कारले खावे. त्याने दमा कमी होण्यास मदत होते. अपचन, पित्त, पोट साफ न होणे यासाठी कारल्याचा जुस फायदेशीर आणि परिणामकारक आहे.

५) कर्करोगाच्या रुग्णांनी कारल्याचे सेवन करणे आवश्यक आहे कारण अनेक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की कारले कर्करोगाचा व्हायरस संपवण्यास मदत करते.

६) कारल्याच्या सेवनाने रक्तदाब, दमा यावर चांगला परिणाम होतो आणि श्वसनाचे आजार बरे होण्यास मदत होते.

७) लठ्ठपणा, वाढलेली ढेरी यासाठी कारले उत्तम असते. त्यामधील अँटिऑक्सिडंट्स पचन क्रियेचा वेग वाढवतात. त्यामुळे शरीरातील कॅलरीज वेगाने खर्च होतात. वजन घटवण्यासाठी कारले उपयोगी ठरते.

८) कारले रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम करते म्हणून मधुमेहाच्या रुग्णासाठी कारले फायदेशीर असते.