हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगने आज पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, कर्नाटक मधील सर्व 224 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या घोषणेमुळे कर्नाटकात आचारसंहिता लागू झाली आहे.
यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, कर्नाटकात यंदा एकूण 5,21,73,579 मतदार आहेत, तर 9.17 लाख नवीन मतदारांची यामध्ये भर पडली आहे. 1 एप्रिल 2023 रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांनाही विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे. 13 एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाईल. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल असून 24 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी एक नवीन आणि विशेष सुविधा देणार आहे. त्यानुसार 80 वर्षांवरील आणि दिव्यांग मतदार घरात बसून आपला मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत.
Karnataka Assembly elections to be held on May 10, counting of votes on May 13
Read @ANI Story |https://t.co/akA9qFBtQ1#KarnatakaElections2023 #KarnatakaAssemblyElection2023 #KarnatakaPolls #ElectionCommission pic.twitter.com/RTQKSNkpyk
— ANI Digital (@ani_digital) March 29, 2023
दरम्यान, कर्नाटकात भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्येच मुख्य लढत पाहायला मिळते. 2018 च्या विधानसभा निवडणुकीनंतर D(S) – काँग्रेस सरकार स्थापन झालेले होते मात्र त्यानंतर 2019 मध्ये हे सरकार पडलं आणि भाजपचे सरकार सत्तेत आलं. काँग्रेस आणि जेडीएसच्याच अनेक बंडखोर आमदारांच्या मदतीने त्यावेळी भाजपने सरकार स्थापन केले. सध्या कर्नाटक विधानसभेतील पक्षीय आकडेवारी बघितली तर भाजपकडे सर्वाधिक 121 आमदार आहेत. तर काँग्रेसकडे 70 आणि जेडीएसकडे 30 आमदार आहेत. यंदाही भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच मुख्य लढत कर्नाटकात पाहायला मिळेल.