हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका आमदारानं सीएएला विरोध करणारे १०२ वर्षीय स्वातंत्र्यसैनिक एच.एस. दुरईस्वामी यांच्याविषयी अभद्र टिप्पणी केल्यानं राज्यात राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. कर्नाटकमधील स्वातंत्र्यसैनिक एच.एस. दुरईस्वामी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधातील आंदोलनाचा चेहरा बनले आहेत. तसेच दुरईस्वामी यांनी केंद्रातील भाजपाप्रणीत सरकारच्या धोरणांवर उघडपणे टीका केल्यानं विजयपुरा नगरचे भाजप आमदार बासगौडा पाटील यत्नाल याने त्यांना ‘बनावट स्वातंत्र्य सेनानी’ आणि ‘पाकिस्तानी एजंट’ असे संबोधले आहे.
दरम्यान, आज कर्नाटक विधानसभेत आमदार बासगौडा पाटील यत्नाल यांच्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाला. राज्यातील विरोधी पक्षांनी सभागृहाच्या मध्यभागी एकत्र येत हा मुद्दा उपस्थित करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करत राहिल्यामुळे सभागृहाची कार्यवाही पुन्हा पुन्हा तहकूब करावी लागली. दरम्यान विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या कोणतीही सूचना न देता हा मुद्दा उपस्थित करण्याच्या प्रयत्नांना सत्ताधारी भाजपने विरोध केला.
दरम्यान, बासगौडा पाटील यत्नाल यांचे विधान घटनाविरोधी आहे, कारण त्यांनी केवळ एच.एस. दुराईस्वामी यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमानच केला नाही तर बसवराज यतानलने संपूर्ण स्वातंत्र्यलढ्याचा अपमान केला आहे. त्यामुळं त्यांचं विधान ‘मूलभूत कर्तव्याचे’ उल्लंघन करणारे आहे. असं कर्नाटकातील काँग्रेसचे नेत्यांचं म्हणणं आहे. तर दुरईस्वामी यांच्याविरूद्ध केलेलं विधान मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं यत्नाल याने स्पष्ट केले आहे. याचसोबत दुरईस्वामी जनता दल सेक्युलर (जेडीएस) आणि काँग्रेसच्या बाजूने बोलणारा ‘भोंगा’ असल्याचेही यत्नालने म्हटले आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.