बंगळुरु । कर्नाटक विधानपरिषदेचे उपसभापती एसएल धर्मेगौडा यांचा मृतदेह रेल्वे रुळांवर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दक्षिण कर्नाटकातील चिकमगळुर या धर्मेगौडांच्या मूळगावात हा प्रकार घडला. एसएल धर्मेगौडा यांची सुसाईड नोट सापडल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे.
कर्नाटक विधानपरिषदेत अवघ्या 15 दिवसांपूर्वी झालेल्या राड्यात ४ आमदारांनी धरत उपसभापतींना खुर्चीतून खाली खेचल्याचं पाहायला मिळालं होतं. धर्मेगौडा यांचा मृतदेह सोमवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास रेल्वे रुळांवर आढळला. 64 वर्षीय धर्मेगौडा हे लो प्रोफाईल आमदार म्हणून प्रसिद्ध होते. मात्र कर्नाटक विधानपरिषदेत झालेल्या राड्यामुळे ते चर्चेत आले.
धर्मेगौडांच्या मृत्यूमुळे कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांचे बंधू एसएल भोजेगौडाही विधानपरिषद आमदार आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचे ते निकटवर्तीय आहेत. (SL Dharme Gowda Karnataka Upper House Deputy Chairman Dies by Suicide)