करुणा धनंजय मुंडे रविवारी परळी वैजनाथमध्ये; पत्रकार परिषद घेऊन करणार धक्कादायक खुलासे?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी करुणा धनंजय मुंडे यांच्या बहिण रेणू शर्मा यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आऱोप केला होता. त्यानंतर मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. प्रकरणाला वेगळे वळण लागण्याआधीच धनंजय मुंडे यांनी आपल्या दूसऱ्या पत्नीशी म्हणजेच प्रेयसीशी असलेल्या संबधांबाबत स्वतःच कबूली दिली. त्यांनी करूणा शर्माशी असलेले संबध सार्वजनिकरित्या स्विकारले होते.

https://www.facebook.com/101087078496774/videos/352082033286233/

धनंजय मुंडे यांनी सार्वजनिकरित्या त्यांच्या नात्याचा स्विकार केला. त्यावेळी दूसऱ्या पत्नीला असलेल्या दोन मुलांना देखील मुंडे यांनी स्वतःचे नाव लावले आहे. त्यांच्या शाळेच्या दाखल्यावर ते धनंजय मुंडे यांची मुले आहेत असे नमूद असल्याचाही खुलासा मुंडे यांनी त्यावेळी केला होता. यानंतर हे प्रकरण शांत झाले होते.

पण आता काही वेळापूर्वी करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला आहे. यामध्ये त्या म्हणाल्या आहेत कि रविवारी त्या परळी वैजनाथ मधील लोकांसमोर काही गोष्टींचा खुलासा करणार आहे. या लाईव्ह दरम्यान त्यांनी आपल्या आईवर, बहिणीवर, मुलांवर आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल सांगितले आहे. तसेच त्यांना व त्यांच्या मुलांना कशाप्रकारे धमकीचे फोन येत आहेत याबाबत देखील त्यांनी सांगितले आहे. ते रविवारी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टींचा खुलासा करणार आहेत. यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.