हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी गंभीर आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी करुणा धनंजय मुंडे यांच्या सोबत लग्न केले असल्याचे जगजाहीर केलं. याचदरम्यन, धनंजय मुंडे यांच्या खुलाशानंतर चर्चेत आलेली त्यांची दुसरी पत्नी करुणा मुंडे आपल्या प्रेमकथेचे रहस्य एका पुस्तकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. करुणा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या नात्यासंबंधीच्या चर्चेला उधाण आले आहे.
करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हंटल की माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेम जीवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे,
https://m.facebook.com/story.php?story_fbid=228099649123356&id=100057699664225
दरम्यान करुणा यांची बहिण रेणूधनंजय मुंडे यांच्याविरुद्ध केलेली तक्रार मागे घेतल्यानंतर हे सगळे प्रकरण थांबले, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा आता करुणा यांनी आपण पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता या पुस्तकामध्ये नेमकी कोणती माहिती असणार याचीच चर्चा सध्या पाहायला मिळत आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून बलात्काराचा आरोप फेटाळून लावला होता. रेणू शर्मा आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, हा आरोप फेटाळताना त्यांनी एका महिलेसोबत (रेणूची बहीण करुणासोबत) संबंध असल्याचं मान्य केलं होतं. आमचे परस्पर सहमतीने संबंध होते आणि त्यातून आम्हाला दोन अपत्य झाली आहेत. या मुलांना मी माझेच नाव दिले आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.