धनंजय मुंडेंनी स्वतःची सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या; करुणा शर्मा यांचा आरोप

0
64
Karuna Munde Dhananjay Munde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या आहेत असा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. करुणा शर्मा कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुक लढवणार असून निवडणुकीचा अर्ज भरण्याआधी त्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना हे आरोप केलेत.

करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी मराठीत येणार आहे. त्यावर काम सुरू आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली आहेत. त्यांनी स्वतःच्या अनेक बायका लपवल्या आहेत. त्यामुळे त्यांना अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येणार आहेत. कारण माझ्याकडे सारे कायदेशीर पुरावे आहेत. त्यामुळे मला अर्ज करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, अस त्यांनी म्हंटल.

दरम्यान, करुणा शर्मा यांनी यापूर्वीच आपण परळी येथे विधानसभा निवडणूक लढवणार आहोत अस म्हणत धनंजय मुंडे यांना आव्हान दिले होते. करुणा शर्मा यांनी शिवशक्ती सेना नावाच्या पक्षाची स्थापना केली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी अद्याप करुणा शर्मा यांच्या कोणत्याही आरोपांना प्रत्युत्तर दिले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here