पुणे | श्री कसबा गणपती म्हणजे पुण्याचे ग्रामदैवतच. पुण्याच्या सार्वजिनक गणेशोत्सवात या गणपतीला पहिले मानाचे स्थान आहे. कसबा गणपतीचा इतिहासही फार जुना आहे. शाहाजी राजांनी (शहाजीराजे भोसले) पुण्यात लालमहाल बांधला तेव्हा शिवाजी महाराजांची आई जिजाबाई साहेबांनी या मूर्तीची स्थापना केली होती.
जिजाबाईंना स्वप्नात गणपतीने द्रूष्टांत दिल्याने जिजाबाईंना या गणपतीची स्थापना केली होती असे म्हट्ले जाते. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाताना या मुर्तीचे दर्शन घेऊन जात असत. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत कसबा गणपतीला पहिले स्थान असते. दरवर्षी पुण्याच्या महापौरंच्या हस्ते पालखीतल्या या गणपतीची पुजा होते आणि मगच विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो.
जेव्हा १८९३ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजिनक गणेशोत्सवाची सुरवात केली त्याच वर्षी कसबा गणपती सार्वजिनक मंडाळाची स्थापना करण्यात आली. यंदा श्री कसबा गणपती सार्वजणीक गणेशोत्सव मंडळाचं १२८ वे वर्ष आहे. कसबा गणपतीची विशेष सजावट पाहण्यासाठी पुणेकर उत्सुक झाले आहेत.