Friday, June 9, 2023

कसब्यात अभिजीत बिचुकलेंना किती मते? नेमका आकडा समोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य असलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे याठिकाणी विजयी झाले आहेत. भापजच्या हेमंत रासने यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र यावेळी चर्चा सुरु आहे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना पडलेल्या एकूण मतदानाची…

कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांना 73284 मते मिळाली तर पराभूत उमेदवार हेमंत रासने यांना 62244 मते पडली. 11 हजार 40 मतांनी रवींद्र धंगेकर यांचा दमदार विजय झाला आहे. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आलेले साताऱ्याचे अभिजित बिचुकले यांना आत्तापर्यन्त हाती आलेल्या निकालानुसार अवघी 47 मते मिळाली आहे. त्यांचा मतदानाचा टक्का 0.3 इतका राहिला आहे. अभिजित बिचुकले यांच्यापेक्षा नोटाला जास्त मतदान झालं आहे हे विशेष

अभिजित बिचुकले हे त्यांच्या रोखठोक आणि परखडपणासाठी ओळखले जातात. कसब्यात अभिजीत बिचुकलेने जोरदार प्रचार केला होता. त्यांना या पोटनिवडणुकीत कपाट हे चिन्ह मिळालं होते. कसब्यातील निवडणूकीत आपल्याला चांगली मतं मिळतील, असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला होता. मात्र या निकालानंतर त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला असेल. बिचुकले यांनी आजपर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत मात्र अजूनही त्यांना यश मिळालं नाही.