हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या भारतात महामार्गाचे काम हे अत्यंत जलद गतीने सुरु असून त्यावर अनेकांना रोजगार निर्माण होत आहे. वाढते शहरीकरण आणि वाढते उद्योग धंदे यामुळे पायभूत सुविधा मजबूत बनवण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील राहते. त्याचाच एक भाग म्हणजे बिहार मधील औरंगाबाद ते काशी या महामार्गाचे काम हे सध्या सुरु असून ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे हा प्रवास जलद गतीने होणार आहे. कसा असेल हा महामार्ग ते जाणून घेऊयात.
2024 पर्यंत पूर्ण होईल मार्ग
या महामार्गाचे काम हे शेवटच्या टप्प्यात आले असल्याची माहिती समोर आली असून त्याचे पूर्ण काम हे 2024 मध्ये होणार आहे असे सांगण्यात येत आहे. हा महामार्ग सहा पदरी असून यावरील प्रवास हा उद्योगाला चालना देऊ शकतो. अशी आशा व्यक्त केली जात आहे. महामार्ग हा एकूण 192.4 किलोमीटरचा असून यासाठी तब्ब्ल 2848 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या महामार्गाची ओळख ही राष्ट्रीय महामार्ग 19 अशी केली जाणार आहे. या महामार्गामुळे उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील एकूण पाच जिल्ह्याची कनेक्टिविटी वाढणार आहे. म्हणजेच हा महामार्ग वाराणसी, चंदौली, कैमूर, रोहतास आणि सासाराम या पाच जिल्ह्यांना जोडला जाणार आहे.
उत्तर प्रदेशमध्ये 50 किलोमीटरचे काम पूर्ण
उत्तर प्रदेश मध्ये महामार्गची लांबी ही एकूण 56 किलोमीटर एवढी राहणार आहे. सध्या येथील 50 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून राहिलेले 6 किलोमीटरचे काम हे लवकरच पूर्ण केले जाणार असल्याचे NHAI च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या मार्गामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला जाईल तसेच पर्यटनाला चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.