दहशतवाद्यांकडून काश्मिरातल्या हिंदू बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्रीनगर : वृत्तसंस्था – काश्मीरमधील कुलगाममध्ये (kulgam) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी कुलगाममधील बँक कर्मचारी विजय कुमार यांची भरदिवसा बँकेत घुसून गोळ्या घालून हत्या केली आहे. या भ्याड हल्ल्यात बँक मॅनेजर विजय कुमार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मूळचे राजस्थानचे रहिवासी असलेले विजय कुमार यांचा काही दिवस पाठलाग केल्यानंतर दहशतवाद्यांनी हे पाऊल उचलले आहे. हि संपूर्ण घटना बँकेत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय?
हा व्हिडिओ कुलगाममधील (kulgam) बँकेतील आहे. एक व्यक्ती बॅग घेऊन बँकेत शिरली. आत जाण्यापूर्वी तो एकदा मागे वळून पाहतो, आत आल्यावर तो एकदा डावीकडे आणि उजवीकडे पाहतो, त्यानंतर तो समोरच्या केबिनमध्ये बसलेल्या मॅनेजरवर पिस्तुलाने गोळीबार करतो आणि घटनास्थळावरून फरार होतो. या हल्ल्यामध्ये बँक मॅनेजर विजय कुमार यांचा जागीच मृत्यू होतो.

कोण होते विजय कुमार?
विजय कुमार हे राजस्थानमधील हनुमानगढचे रहिवासी होते, ते कुलगामच्या (kulgam) मोहनपुरा येथे बँक मॅनेजरच्या पदावर होते, दहशतवाद्यांनी त्यांना बँकेच्या आतच गोळ्या घातल्या. दोन दिवसांत ही दुसरी हत्या आहे. मंगळवारी शाळेतील शिक्षिका रजनीबाला यांची दहशतवाद्यांनी हत्या केली आणि आज सकाळी बँक मॅनेजर विजय कुमार यांना टार्गेट करण्यात आले. हा हत्येचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

हे पण वाचा :
IAS ची नोकरी सोडून सुरु केला स्वतःचा व्यवसाय; आज आहे तब्ब्ल 15,000 कोटींच्या कंपनीचा मालक

3 महिला गँगस्टरला पोलिसांकडून अटक, त्यांचा कारनामा ऐकून बसेल धक्का

भोंग्याचा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे…; राज ठाकरेंचे मनसे सैनिकांना पत्र

इलेक्ट्रिक आणि SUV सहित जूनमध्ये लॉन्च होणार ‘या’ 4 सर्वोत्कृष्ट कार !!!

मला आता कारणे सांगू नका, पाणीप्रश्न तत्काळ मार्गी लावा ; मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादच्या अधिकाऱ्यांना सूचना

Leave a Comment