हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Upcoming cars : जर आपल्यालाही नवीन कार घ्यायची असेल तर आणखी काही दिवस थांबणे शहाणपणाचे ठरेल. कारण येत्या महिन्यात भारतीय बाजारपेठेत काही चांगल्या चारचाकी गाड्या लॉन्च होणार आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक कार, एसयूव्ही आणि सेडानचा समावेश आहे. चला तर मग या महिन्यात लॉन्च होणाऱ्या 4 कार आणि त्यांच्या फीचर्सबद्दल जाणून घेउयात…
Mahindra Scorpio N
अनेक महिने वाट पहिल्यानंतर आता महिंद्रा पुढील महिन्यात आपल्या लोकप्रिय गाडी असलेल्या SUV Scorpio चे नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. ती पुढील महिन्यात 27 जून रोजी लॉन्च केली जाणार आहे. आउटगोइंग मॉडेलच्या तुलनेत या 2022 स्कॉर्पिओ मध्ये सर्वकाही नवीन असेल. Scorpio N पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधन इंजिनांसह लॉन्च केली जाईल. महिंद्राने स्पष्ट केले आहे की ते Scorpio N चे 4×4 व्हेरिएंट सादर करतील. Scorpio N ला पर्याय म्हणून कंपनी 2.2-लीटर डिझेल इंजिन आणि 2-लीटर पेट्रोलवर चालणारे इंजिन लॉन्च करू शकते. Upcoming cars
नवीन Hyundai Venue
Hyundai 16 जून रोजी नवीन Hyundai Venue लाँच करणार आहे. व्हेन्यू फेसलिफ्ट मध्ये अनेक बदल केले गेले आहेत. यामध्ये एक्सटीरियर आणि इंटीरियर व्यतिरिक्त अनेक नवीन फीचर्स दिले जातील. या नवीन व्हेन्यूचा फ्रंट लुक Hyundai Tusso सारखाच असेल. याच्या पुढील बाजूला नवीन लोखंडी जाळी दिसेल. यामध्ये नवीन डिझाईन केलेल्या हेडलँपसोबत फॉग लॅम्प आणि टर्न सिग्नल इंडिकेटरही दिले जातील. या नवीन Hyundai Venue फेसलिफ्ट 2022 मध्ये 1.2 लीटर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही गाडी 1.5 लिटर डिझेल इंजिन आणि 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये देखील मिळू शकेल. Upcoming cars
Volkswagen Vertus
Volkswagen 9 जून रोजी मध्यम आकाराची sedan Vertus लाँच करेल. Volkswagen च्या पुणे येथील चाकण प्लांटमध्ये ही कार सध्या तयार केली जात आहे. Vertus मध्ये दोन इंजिन पर्याय असेल. यामध्ये 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनचा समावेश आहे जो 113 Bhp पॉवर आणि 175 Nm टॉर्क जनरेट करेल. तर दुसरीकडे, 1.5-लीटर TSI इंजिन 148 Bhp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करेल. त्याचबरोबर या कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि 7-स्पीड DSG गिअरबॉक्स देखील मिळेल. Upcoming cars
Citroen C3
फ्रेंच ऑटोमेकर असलेली Citroen एक सबकॉम्पॅक्ट SUV लाँच करण्यासाठी सज्ज आहे. सप्टेंबर 2021 मध्ये भारतात ती लॉन्च करण्याची घोषणा देखील करण्यात आली होती. आता ती लवकरच बाजारात येण्याची शक्यता व्यक्त होते आहे. या Citroen C3 मध्ये एक स्कल्पेटेड बोनेट, एक मोठी हेक्सागोनल ग्रिल, अँग्युलर DRL सह स्प्लिट-प्रकार हेडलाइट्स, बंपर-माउंटेड फॉग लॅम्प आणि एक सिल्व्हर स्किड प्लेट दिले जातील. यासोबतच कारच्या बाजूला ब्लॅक-आउट बी-पिलर, इंडिकेटर-माउंटेड ORVM, ब्लॅक रूफ रेल आणि मल्टी-स्पोक अलॉय व्हील मिळतील. तसेच या Citroen C3 मध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन मिळेल. Upcoming cars
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hyundai.com/in/en
हे पण वाचा :
Maruti Brezza ची ‘ही’ नवीन कार लवकरच होणार लॉंच; दमदार पॉवर आणि मायलेजही
HDFC : ‘या’ कंपनीच्या होम लोनवरील व्याजदरात एका महिन्यात तिसऱ्यांदा वाढ !!!
Gold Price Today : सोने महागले तर चांदीमध्ये झाली घट, आजचे नवीन दर पहा
EPFO : कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! आता व्याजाचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार
LPG Price : व्यावसायिक गॅस सिलेंडर 136 रुपयांनी स्वस्त !!! घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही