Kavya Maran : काव्या मारन ‘या’ तरुणाशी करणार लग्न?? सोशल मीडियावर चर्चाना उधाण

Kavya Maran Marriage
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Kavya Maran। सनरायजर्स हैद्राबादची मालकीण आणि प्रसिद्ध उद्योगपती काव्या मारन सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. खास करून आयपीएल सामन्यावेळी काव्याकडे सर्वांचं जास्त लक्ष्य असते. आता आयपीएल संपून १० दिवस झालं असलं तरी पुन्हा एकदा काव्या मारनची चर्चा सुरु झाली आहे. निमित्त ठरलंय ते तिच्या लग्नाचं.. होय काव्या मारन लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जातंय… तिचा होणारा नवरा हा दुसरा तिसरा कोणी नसून साउथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक अनिरुद्ध रविचंदर असेल.

डिनरमध्ये एकत्र पाहिले- Kavya Maran

खरं तर सोशल मीडियावर काव्या आणि अनिरुद्ध रविचंदर एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक चर्चा सुरु असतात. आता तर हे दोघेही लग्न करणार असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. परंतु लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही आणि दोघांनीही या वृत्तांना नकार दिला आहे.अलीकडेच, काही चाहत्यांनी दावा केला की त्यांनी प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन (Kavya Maran) यांना एका खाजगी डिनरमध्ये एकत्र पाहिले. वरून देखील असा अंदाज व्यक्त केला जात आहे, की ते लवकरच लग्न करणार आहेत. मात्र अजून ठोस अशी घोषणा याबाबत करण्यात आलेली नाही..

कोण आहे अनिरुद्ध रविचंदर –

अनिरुद्ध रविचंदर हे देशातील एक प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आहेत. त्यांनी ‘जवान’ सहअनेक उत्तम दक्षिण चित्रपटांना संगीत दिले आहे. अनिरुद्ध यांचे पहिले काम ‘कोलावेरी डी’ होते जे खूप प्रसिद्ध झाले.’जवान’ साठी सुमारे १० कोटी रुपये घेऊन अनिरुद्ध सर्वाधिक मानधन घेणारा संगीत दिग्दर्शक बनला आहे. त्याने ए.आर. रहमान यांनाही मागे टाकलं. ए.आर. रहमान एका चित्रपटासाठी सुमारे ८ कोटी रुपये घेतात असं बोललं जातं. अनिरुद्ध रविचंदर यांची एकूण संपत्ती ५० कोटींच्या जवळपास असल्याचं बोललं तर दुसरीकडे काव्या मारनची (Kavya Maran) अंदाजे एकूण संपत्ती ४०९ कोटी असल्याचे सांगितले जाते. ती सन टीव्ही नेटवर्क लिमिटेडची कार्यकारी संचालक आणि सनरायझर्स हैदराबाद (आयपीएल) आणि सनरायझर्स ईस्टर्न केप (एसए२०) ची सह-मालक आणि प्रमुख आहे.