हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kedar Shinde) केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडला. केवळ महिला प्रेक्षक नव्हे तर पुरुष प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला प्रचंड प्रेम दिले. त्यामुळे ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा ब्लॉकबस्टर सिनेमांच्या यादीत जाऊन बसला. ‘बाईपण भारी देवा’च्या भव्य यशानंतर आता केदार शिंदे यांनी आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. ज्याचे नाव ‘आईपण भारी देवा’ असे आहे. आज महिला दिनाचे औचित्य साधून या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे.
जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘आईपण भारी देवा!’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत याबाबत स्वतः दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी माहिती दिली आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहून प्रेक्षकांनी सिनेमाबाबत आपली उत्सुकता दर्शवली आहे. आज या सिनेमाची केवळ घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान या नव्याकोऱ्या चित्रपटात कोणकोणते कलाकार दिसणार? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
‘आईपण भारी देवा’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘प्रत्येक घरातल्या बाईपणाच्या भारी गोष्टीनंतर दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) आणि जिओ स्टुडिओज घेऊन येत आहेत. प्रत्येक घरातल्या आईपणाची भारी गोष्ट ‘आईपण भारी देवा’’. बाईतील आईपणाची गोष्ट घेऊन केदार शिंदे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या काळजाला हात घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. पोस्टर रिलीजनंतर प्रेक्षकांची चित्रपटाबाबत असणारी उत्सुकता शिगेला पोहोचताना दिसत आहे.
हा चित्रपट फक्त स्त्रीसाठी नाही तर… (Kedar Shinde)
केदार शिंदे यांनी ‘आईपण भारी देवा’ या चित्रपटाचे पोस्टर अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. ज्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेकांनी चित्रपटातील कलाकार, कथानक आणि प्रदर्शनाच्या तारखेबाबत विचारणा केली आहे. दरम्यान या चित्रपटाबाबत बोलताना (Kedar Shinde) केदार शिंदे यांनी सांगितले की, ‘बाईपण भारी देवामूळे मला स्त्री मन समजून घेण्याची संधी मिळाली. या यशाने माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. मग डोक्यात आलं की, आईपण किती महत्वाचा विषय आहे? एक आईच असते जी पुरूषाला जन्म देते. तिच्या भावना या अथांग समुद्रासारख्या असतात. त्यातलं ओंजळभर पाणी या चित्रपटाच्या निमित्ताने रसिकांच्या चरणी वाहणार आहे. हा चित्रपट फक्त कुणा स्त्रीसाठी नाही. तर तो समस्त रसिकांसाठी असेल. कारण प्रत्येकाला आई असते.’