पाटण | तालुक्यातील केर -बोंद्री विकास सेवा सोसायटी या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून सोसायटीवर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाची सत्ता अबाधित राहिली आहे.
सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक पदी सर्वसाधारण प्रवर्ग मधून दिलीपराव पाटणकर, सुभाष यादव, बाळासो पाटील, प्रकाश यादव, गुलाब यादव, गोपाळ पवार, आनंदा पवार, कृष्णत पवार, महिला राखीव मधून हौसाबाई यादव, अनुसया चव्हाण, अनुसूचित जाती जमाती मधून सुरेश लादे, इतर मागास प्रवर्गातून शिवाजी जाधव, गंगाराम यमकर, यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सर्व नवनिर्वाचित संचालकांचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सातारा जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित पाटणकर, केरचे माजी सरपंच बाळासाहेब पाटणकर, माजी चेअरमन ज्ञानदेव पवार, आनंदा आरेकर, नंदकुमार यादव, नंदकुमार आरेकर, प्रताप पवार, सचिव कदम यांनी अभिनंदन केले.