RSS च्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला ; कार्यालयाचं मोठं नुकसान

0
65
Kerala Bomb Attak RSS Office
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळमधील कन्नूर जिल्ह्यात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. येथील पय्यानुरमध्ये असणाऱ्या संघाच्या कार्यालयावर आज सकाळी अज्ञात व्यक्तींनी बॉम्ब फेकल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळच्या सुमारास कार्यालयावर हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पय्यानुर पोलिसांच्यावतीने देण्यात आलेली आहे. या हल्ल्यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र या बॉम्बस्फोटामुळे इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. कार्यालयातील फर्निचरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच हल्ला कोणत्या कारणामुळे करण्यात आला याचा तपास सुरु केला आहे. सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे प्राथमिक तपास हाती घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here